breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#War Against Corona : संकट गडद… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…लॉकडाउन वाढवणे अपरिहार्य!

नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 14 एप्रिला या लॉकडाऊनची मर्यादा संपणार आहे. मात्र, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, अशी माहिती दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिली. या दोघांनीही यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे. देशातील लॉकडाऊन विषयी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही राज्यातील मुख्यमंत्री यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान यांनी लॉकडाउन वाढण्याचे संकेत दिले आहेत.

आजच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. हे लॉकडाऊन नसून लोकइन असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. उद्याच्या उज्वल भारतासाठी माणसांचा जीव सर्वकाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम राहणार आहे. या काळात सर्व बॉर्डर बंद राहतील. जे कामगार अडकले आहेत, तेही राज्य सोडून जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात कोरोनाबाबत एकच भूमिका राहणार असल्याचंही ते म्हणाले. आता लॉकडाऊन काढले तर जे मिळवले ते सर्व जाईल, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार असल्याचं त्यांनी सांगितले. येत्या 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, काही राज्यांनी हे लॉकडाऊन वाढण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता कोणता निर्णय होणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button