breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: खासदार नवनीत राणांची प्रकृती खालावली, 6 दिवसांपासून सुरू आहे कोरोनावर उपचार

अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील बारा जणांना कोरोनाची बाधा झाली असून सर्वांवर उपचार देखील सुरू आहे. मात्र, उपचारादरम्यान  नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याचे वृत्त समोर आलेले आहे. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडलेली होती. त्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.

6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले होते. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आलेला आहे. राणा कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेले होते. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यावरगेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही  नवनीत राणा यांनी केलेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button