breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोना विलगीकरण कक्षातील गर्भवती महिलेवर बलात्कार

करोनामुळे देशभरामध्ये भीतीचे वातावरण असतानाच बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करोनाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या २५ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांना रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याने या महिलेचा बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या महिलेला उपचारासाठी गया येथील अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेज अण्ड हॉस्पीटलमध्ये (एएनएमएमसीएच) दाखल करण्यात आलं होतं अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. येथील एका कर्मचाऱ्याने दोन दिवस या महिलेवर बलात्कार केला. रुग्णालयामधून घरी सोडण्यात आल्यानंतर अती रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने रौशनगंज पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजय कृष्ण प्रसाद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका टीमची स्थापना केली आहे. तसेच हे प्रकरण गंभीर असून रुग्णालयामधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज तपासून पाहिले जातील आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button