breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांवर अण्णासाहेब महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार

शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाला ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित करण्यात आल्याने याठिकाणी सोमवारपासून केवळ करोना रुग्णांची तपासणी आणि उपचार सुरू झाले आहेत. इतर आजाराच्या रुग्णांवर जवाहर फाउंडेशनच्या अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

करोनाबाधित रुग्णांवर स्वतंत्रपणे आणि योग्य उपचार व्हावेत, यासाठी कोविड आणि इतर रुग्णांची व्यवस्था स्वतंत्र ठिकाणी करावी, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार यापूर्वीच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु, अन्य रुग्णांच्या उपचारासाठी शहरात सोय नसल्याने त्यांच्यावरही हिरे महाविद्यालयातच उपचार सुरू होते. मागील आठवडय़ात पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी पुन्हा सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, कोविडचे समन्वयक डॉ. दीपक शेजवळ, एसीपीएम कॉलेजच्या संचालक डॉ. ममता पाटील, प्राचार्य डॉ. विजय पाटील, आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, धुळे आयएमएच्या अध्यक्षा डॉ. जया दिघे, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत कोविड आणि इतर रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णालय असावे असे ठरले. त्यानुसार हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय सोमवारपासून केवळ कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित केले जाणार आहे. याठिकाणी करोना तपासणी आणि बाधित रुग्णांवर उपचार केले जातील. तसेच शहरातील अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इतर आजाराच्या रूग्णांसाठी असेल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. समन्वयक म्हणून डॉ.दीपक शेजवळ हे जबाबदारी सांभाळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button