breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | केरळची कोरोनाशी झुंज ठरतेय यशस्वी

तिरुवअनंतपूरम : चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने साऱ्या जगात थैमान घातलं आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या चिंताजनक आकडा गाठत आहे. तर, दुसरीकडे या विषाणूची लागण झाल्यामुळे कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.मानवी जीवनावरच आघात करणाऱ्या या विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून भारतातही पाहायला मिळत आहे. याचाच प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुन देशात लॉकडाऊन लागू झाला.

सर्वत्र या लॉकडाऊनचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्यामध्ये प्रतितबंधात्मक उपाय, सतर्कता आणि निर्देशांचं पालन करत आता केरळ या राज्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button