breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus: औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आतापर्यंत १,२७६; आतापर्यंत ५८३ जणांनी केली मात

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये करोनाचा विळखा दिवसगाणिक वाढतच चालला आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी २८ नवे रूग्ण आढळून आल्यामुळे करोनाग्रस्तांची संख्या एक हजार २७६ झाली आहे. आज आढळलेल्या करोनाग्रस्तांमध्ये महिला आणि १५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५८३ औरंगाबादकरांनी करोनावर मात केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शनिवारी औरंगाबादमध्ये ३० करोनाग्रस्त आढळून आले होते.

औरंगाबादमध्ये रविवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
औरंगाबाद शहरामध्ये रविवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. न्याय नगर, गारखेडा (2), टाऊन हॉल (1), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3), कैलास नगर (4), राम नगर, एन-2, सिडको (4), नारळीबाग (1), गौतम नगर, जालना रोड (1), संभाजी कॉलनी, सिडको (1), महेश नगर (1), जुना बाजार (1), एमजीएम परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), शंकुतला नगर, शहानूरवाडी (1), औरंगपुरा (2), आशियाद कॉलनी, बीड बायपास (1), वडगाव कोल्हाटी (2), अब्दाशहा नगर,सिल्लोड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

शनिवारी घाटीतून  ४७ जण कोरोनामुक्त, तीन जणांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शनिवारी सात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये बारी कॉलनीतील ७० वर्षीय पुरूष, सिटी चौकातील ६५ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ४२ वर्षीय पुरूष, पंचकुवा येथील ३५ वर्षीय महिला, जुना मोंढा येथील २५ वर्षीय महिला, सिल्लेखाना येथील २१ वर्षीय महिला आणि फुलशिवरा ७६ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे. यामुळे घाटीतून आतापर्यंत ४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. सध्या घाटी रुग्णालयात ७८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६९ जणांची प्रकृती सामान्य असून नऊ जणांची गंभीर आहे.

तसेच घाटीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथील ६१ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी सकाळी ११.४० वाजता, किराडपुऱ्यातील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी संध्याकाळी ११.४० वाजता आणि सिटी चौकातील ७२ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज पहाटे पाच वाजता मृत्यू झाला आहे. घाटीमध्ये आजपर्यंत ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button