breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात करोनाबाधित रुग्णाचा १३ मे रोजी मृत्यू झाला होता. मृताचा करोना तपासणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने मूर्तिजापूर शहरात खळबळ उडाली आहे. अकोला शहरात रुग्ण वाढीचे सत्र सुरूच असून काल तब्बल ३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८ जणांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २५७ वर पोहोचली. सध्या १२२ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.