breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:सिगरेट बनवणाऱ्या कंपनीचा तंबाखूपासून कोरोना लस बनवल्याचा दावा

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रसाराचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनामुळे जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपाय म्हणून शास्त्रज्ञांना अजूनही प्रभावी लस सापडलेली नाही. जगातले संशोधक कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता एका ब्रिटिश अमेरिकन कंपनीने तंबाखूपासून कोरोना व्हायरसवरची लस तयार केल्याचा दावा केला आहे.

तंबाखू बनवणारी जगातली दुसरी सगळ्यात मोठी कंपनी असलेल्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या कंपनीने तंबाखूच्या झाडापासून कोरोनाची लस तयार केल्याचा दावा केला आहे. ही लस बनवण्यासाठी वापरलेले घटक तंबाखूच्या झाडापासून घेतल्याचं कंपनीने सांगितलं आहे. लस बनवण्यासाठी कोरोना व्हायरसचा एक भाग कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आला, यानंतर व्हायरसची संख्या वाढवण्यासाठी याला तंबाखूच्या पानांवर सोडण्यात आलं. पण जेव्हा तंबाखूची पानं कापण्यात आली तेव्हा यामध्ये व्हायरस मिळाला नसल्याचा कंपनीचा दावा आहे.

तंबाखूच्या पानांपासून लस बनवणं सगळ्यात जलद आणि सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. एवढच नाही तर या लशीला थंड तापमानात ठेवण्याचीही गरज नसल्याचं कंपनीने सांगितंल आहे. या लसीचा एकच डोस इम्यून सिस्टिमसाठी असरदार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लशीची प्री क्लिनिकल ट्रायल एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. या ट्रायलचा निकाल यशस्वी होता, आता माणसांवर याची ट्रायल करण्याची तयारी सुरू आहे. या ट्रायलसाठी फूड ऍण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनकडून परवानगी मागण्यात आली आहे. माणसांवर या ट्रायलचे प्रयोग यशस्वी झाले, तर कोरोनाशी लढण्यात ही लस वरदान ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button