breaking-newsमुंबई

#CoronaVirus:बेस्टच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई: शहरातील लोकलसेवा बंद असल्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण भार वाहणाऱ्या बेस्ट सेवेतील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज बेस्टच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर झाले. त्यामुळे बेस्टमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १३७ इतका झाला आहे. आतापर्यंत बेस्टच्या आठ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कालच बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली होती. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण मिळावे. मृत कर्मचाऱ्यांच्या नातलगांना शासन योग्य आर्थिक मोबदला देत असल्याचा आरोप बेस्ट कर्मचारी कृती समितीने केला होता. तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दररोज कोरोना टेस्ट केली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याशिवाय, कर्मचाऱ्यांनी कामावर जाऊ नये, असे बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीकडून सांगण्यात आले होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button