Uncategorized

#Coronavirus:पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटिव्ह

पुणे : पुण्यात कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केलेल्या कोरोना संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाच्या भीतीने संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता होती.

कोरोना संशयित रुग्णाने गुरुवारी (14 मे) रात्री वीज गेल्याची संधी साधत रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. या 24 वर्षीय तरुणाला सर्दी, खोकला आणि ताप होता. त्यामुळे या तरुणाला कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच तरुणाचा कोरोना तपासणीचा अहवाल शुक्रवारी (15 मे) येणार होता. मात्र कोरोनाची भीती सतावत असल्याने बेचैन असलेल्या तरुणानं आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय घेतला.

तरुणाने तपासणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करायला हवी होती, असं मत डॉक्टर आणि नातेवाईकांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button