Uncategorized

#CoronaVirus:नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर

नागपूर : नागपुरातील हॉटस्पॉट मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता नवीन भागातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नागपुरातील काही नवीन भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. गड्डीगोदाम, नाईक तलाव, लोकमान्य नगर, टिमकी या भागात रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आज नागपुरात नव्या 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 571 वर पोहोचला आहे.

नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे नागपुरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आज 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही 383 वर पोहोचली आहे. तर नागपुरात कोरोनामुळे 11 जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button