TOP Newsमुंबई

भायखळ्यात उड्डाणपुलाची उभारणी सुरू

भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांदरम्यान १९२२ मध्ये बांधण्यात आलेला भायखळा उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन पद्धतीच्या केबल स्टेड पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमआरआयडीसी) या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या पुलासाठी खांब उभारण्याचे काम सुरू झाले असून या पुलाचे बांधकाम ३५० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा एमआरआयडीसीचा मानस आहे.

काही वर्षांपूर्वी अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्वच पुलांची आयआयटी, मुंबई या संस्थेमार्फत संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. संरचनात्मक तपासणीअंत आयआयटी, मुंबईच्या तज्ज्ञांनी काही पुलांची संरचनात्मक दुरुस्ती, तर काही उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ११ पुलांच्या पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलांच्या पुनर्बांधणीसाठी एमआरआयडीसी मुंबई महानगरपालिकेची मदत घेत आहे. दादरचा टीळक पूल, रे रोड उड्डाणपूल, भायखळा-सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यानचा उड्डाणपूल आदींची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

वांद्रे सागरीसेतूच्या धर्तीवर केबल स्टेड पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या उभारण्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता नाही. कमीत कमी खांबांवर पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन केबल स्टेड पूल आताच्या पुलाच्या ठिकाणीच बांधण्यात येणार आहे, अशी माहीती ‘एमआरआयडीसी’कडून देण्यात आली. पहिला केबल स्टेड पूल बांधल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.

भायखळा रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. भायखळा उड्डाणपूल १९२२ मध्ये बांधण्यात आला होता. भायखळा केबल स्टेड पुलाच्या कामाला सुरुवात झाली असली तरीही मुंबई महानगरपालिका तसेच रेल्वेच्या काही परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत. या पुलासाठी सध्या खांबांची उभारणी करण्यात येत आहे. नवीन पुलावर आठ मार्गिका असतील.

नवीन केबल स्टेड उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये
लांबी ९१५.८१७ मीटर
अंदाजे खर्च किंमत – २८१ कोटी रुपये
दोन्ही बाजूला सेवा रस्ते
दोन्ही दिशेला सेल्फी पॉइंट
बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी ३५० दिवस.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button