breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आनंददायी ः सत्तांतरानंतर राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाला कमालीची गती, भूसंपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण

मुंबई । महान्यूज ।

ठाकरे सरकारच्या काळात रेंगाळलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला  आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात गती मिळाली आहे. आतापर्यंत राज्यातील ९४.३७ टक्के भूसंपादन प्रक्रिया  पूर्ण झाली असून ९७.४७ टक्के एकूण भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचा हा अतिमहत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

मुंबईला अहमदाबादेत अवघ्या तीन तासांत जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला तत्कालीन युती सरकारने मान्यता दिली होती. भाजपाचा हा अतिमहत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाने या प्रकल्पासाठी जोर लावला होता. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात भूसंपादन प्रक्रिया रखडली होती. ठाकरे सरकार या प्रकल्पाविरोधात असल्याने त्यांनी प्रकल्पासाठी उचित सहकार्य केले नाही. परिणामी प्रकल्प रखडला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे काम रेंगाळले. अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पाने वेग घेतला आहे. नव्या सरकारने मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील वन विभागाच्या अखत्यारित असलेली जागा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या जागेच्या वापरासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. केंद्रीय पर्यावरण विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार, ९५ हेक्टर जमिनीवर बुलेट ट्रेनचे होणार आहे. महाराष्ट्रातील ४३३.८२ हेक्टर जमिनीवर बुलेट ट्रेनचे काम होणार असून यापैकी ४०७ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील अधिग्रहण आणि भूसंपाद प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. तर, दादरा-नगर हवेलीमधील १०० टक्के, गुजरातमध्ये ९८.८ टक्के जमीन संपादित झाली आहे. या तीन राज्यातील एकूण १ हजार ३९६ हेक्टर जमिनीवर बुलेट ट्रेन प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यापेकी, यापैकी ९७.४७ टक्के अर्थात १,३५४ हेक्टर जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशी माहिती ‘एनएचएसआरसीएल’ने दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात भूमिगत टर्मिनस बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २१ ऑक्टोबरला निविद काढण्यात येणार आहे. तर, येथे टर्मिनस बांधण्यासाठी जागेचे हस्तांतरण सप्टेंबरपर्यंत होणार आहे.

काय आहे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८.१७ किमी लांबीचा आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या काही तसांवर येणार आहे. बुलेट ट्रेन मुंबई, ठाणे, पालघरमार्गे गुजरातच्या वलसाड, नवसारी, सूरत, भारूच, वडोदरा, आणंद, खेडा आणि अहमदाबाद अशी धावणार आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने भूमी हस्तांतरण प्रक्रियेत विलंब केल्याने आणि कोरोना महामारीमुळे काम थांबल्याने हा प्रकल्प रखडला होता, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्च महिन्यात लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नादरम्यान दिली होती.

मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा वेग ३२० किमी प्रति तास

मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा वेग ३२० किमी प्रति तास असणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन तासांत हे अंतर कापता येणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा एकूण खर्च १.०८ लाख कोटी असून शेअर पॅटर्ननुसार, केंद्र सरकारला NHSRCLला 10,000 कोटी रुपये द्यावे लागतील, तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना प्रत्येकी 5,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. बाकी उर्वरित कर्ज जपानकडून ०.१ टक्के व्याजाने घेण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button