Uncategorized

अविनाश बागवे यांना दिलासा: नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती.

पुणे: अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या लघुवाद न्याय दंडाधिकारी पुणे यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नगरसेवक बागवे यांना दिलासा मिळाला आहे. लघुवाद न्याय दंडाधिकारी पुणे यांनी नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दि. 29 जून 2021 रोजी दिला होता. या आदेशाच्या विरोधात नगरसेवक बागवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते.

 

लघुवाद न्याय दंडाधिकारी, पुणे यांनी नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दि. २९ जून २०२१ रोजी दिला होता. या आदेशाच्या विरोधात नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे विधीतज्ञ ॲड. गिरीश गोडबोले यांनी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यातर्फे युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दि. १४ जुलै २०२१ रोजी लघुवाद न्याय दंडाधिकाऱी, पुणे यांनी दिलेल्या आदेशाला दि. २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे.

 

पुणे महापालिकेच्या 2017 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बागवे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनधिकृत बांधकाम, बँक खाती आणि पोलिसांत दाखल असलेले गुन्हे आदी माहिती दिली नसल्याची तक्रार मनसेचे उमेदवार अ‍ॅड.भुपेंद्र शेडगे यांनी निवडणुक अधिकार्‍यांकडे केली होती. ही तक्रार निवडणुक अधिकार्‍याने फेटाळल्यानंतर शेडगे यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button