ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शहरात “ईझी पेडल राईड शेअर” वाहतूक प्रकल्पाचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

स्मार्ट सायकल राइडशेअर प्रणालीचा लाभ घेता येणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने शहरात “ईझी पेडल पब्लिक राईड शेअर” हा सार्वजनिक उपक्रम राबविण्यात येणार असून, आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना प्रगत युरोपीय तंत्रज्ञानावर आधारित पेडेलेक (इलेक्ट्रिक सायकल) आणि स्मार्ट सायकल राइडशेअर प्रणालीचा लाभ घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर, वाकड आणि विशाल नगर या भागात हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

सायकलिंग संस्कृतीला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत असून, यामुळे शहराचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे, ईझीपेडल पब्लिक राइडशेअर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत ती कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. शहराच्या विकासाला चालना देऊन नागरिकांना वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. शहराची सार्वजनिक वाहतूक आणि मेट्रो यंत्रणेसाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटीकरिता सार्वजनिक ठिकाणे, सामुदायिक जागा, निवासी क्षेत्रे आणि व्यावसायिक झोनमध्ये नियोजनपूर्वक सौर पॅनेलद्वारे चालणारे स्मार्ट डॉक स्थापित करण्यात येणार आहेत.

शहरामध्ये सध्या पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांसोबत कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी मजबूत नेटवर्क तयार करणेत येत आहे. अभियंता निखील देशमुख आणि प्रत्यूष श्रीनिवासन यांनी ईझीपेडल हे स्टार्टअप सुरू केले असून युरोपियन तंत्रज्ञान आणि जागतिक मॉडेल्सपासून राइडशेअर प्रणाली विकसित केली आहे. शहरामध्ये नवीन प्रकल्पांच्या विकसनासाठी कटीबद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरमध्ये या स्टार्टअपचे कामकाज सुरू आहे. यासाठी कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, सायकल मेयर आशिक जैन, उपअभियंता सुनील पवार यांचे सहकार्य लाभत आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, “या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील शेवटच्या टप्प्यापर्यंत सायकल शेअरिंग कनेक्टीव्हीटी तयार होईल. सायकल ट्रॅकचा वापर वाढेल. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेची नागरीक केंद्रित कामाकाजाप्रती असलेली वचनबद्धता देखील प्रदर्शित होणार असून, या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.”

वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत…
सायकलच्या वापरामुळे शरीराचा व्यायाम होउन आरोग्यामध्ये सुधारणा होईल. कार्बन उत्सर्जन आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, त्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच स्वच्छ आणि हरित शहरासाठी प्रोत्साहन मिळेल. राइड शेअर प्रणालीच्या माध्यमातून कमी अंतरासाठी परवडणारा आणि सोयीस्कर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे बीआरटी आणि मेट्रो स्थानकांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूकीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रगत युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ही सेवा फायदेशीर आहे. तसेच नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. या उपक्रमामुळे सायकलिंग आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर वाढणार आहे. शहरामध्ये मोटारविरहित प्रवासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button