‘संजय राऊतांवर कारवाई करा’; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
आम्हाला कायदे शिकवणारे राज्य महिला आयोग झोपलेत काय?
मुंबई : भाजपा पुरस्कृत गंडांनी अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत केला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, ओ सर्वज्ञान, खोटी माहीती देत का जनतेची दिशाभूल करताय? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली आता ही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असतांना का तुम्ही खोटी माहीती देताय.
आरोपी भाजपपुरस्कृत म्हणता अहो आरोपी भाजपचं काय पण कुठल्याही पक्षाशी संबंधीत नाहीत. १०३ दिवसांसाठी आत काय गेलात मती गुंग झाली तुमची, पिडीतांना जाती जातीत वाटणारे तुम्ही कोण? आमच्यासाठी पिडीता ही फक्त मुलगी असते व या घटनेतील मुलगी सुरक्षित आहे तिची तब्येतही स्थिर आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
सगळ्यात महत्वाचं तुम्ही पिडीतेचा फोटो कसा काय viral केलात? आता कुठे गेले सगळे आम्हाला कायदे शिकवणारे राज्य महिला आयोग झोपलेत काय? कधी पाठवतायं मग नोटीस या सर्वज्ञानींना कि त्या फक्त आमच्यासाठी आहेत ??
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराषट्र सरकार यांच्याकडे मागणी आहे तात्काळ या संजय राऊतांवर कारवाई करा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.