breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मी कोणाचीही तुलना केली नाही”; चित्रा वाघ यांची सारवासारव

स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात अली. तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत माञ चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे, असं विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. याविधानावरुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणारे हे महापुरुषांनाच आदर्श मानतात! काल पुण्यनगरीमध्ये हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला गेले असता केवळ स्त्रियांनीच पुरुषांचे औक्षण करायचं ही जुनी रूढी मोडत स्त्री सक्षमीकरणासाठी अग्रणी असणाऱ्या माझ्या भावांनी माझे औक्षण केले जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबा फुले यांनी रोवली तसचं, स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला. उगा पराचा कावळा करून, अर्थाचा अनर्थ करण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांनी वेळीच स्वतःला सावरुन लवकरच सुधारावे, ही विनंती !, अंस चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महिलांच्या जेवढ्या चळवणी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचं केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरूवात येथून झाली आहे. आजच्या कार्यक्रमात देखील एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळं. चंद्कांत पाटील हे नेहमीच परिवर्तन घडवत असतात. आज देखील त्यांच्या माध्यमातून नवीन पायंडा पडला आहे. त्यामुळंच मी नेहमी म्हणत असते, आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. असे जोतिबा समजात जास्तीत जास्त तयार व्होव्हेत याच आजच्या दिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button