breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

चिंचवड पोटनिवडणूक : पिंपरी-चिंचवड कोअर कमिटीशी चर्चा, मग निर्णय : चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. या करिता आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र, महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. त्यांच्या काही नेत्यांनी, तर पोस्टर लावले आहेत. आज पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे आणि कोअर कमिटी यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्त टिळक यांचं निधन झाल्याने ह्या दोन्ही मतदार संघातील जागा रिक्त झाल्या. यानिवडणुकीत भाजपकडून कुणाला उमेदवारी देण्यात यावी, यासाठी आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की,  चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोरदार  तयारी केली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी  आम्ही तीन समित्या स्थापन केल्या आहेत. यामध्ये राजकीय समितीचं नेतृत्व आमदार माधुरी मिसाळ करतील, तर यामध्ये संजय काकडे, धीरज घाटे, हेमंत रासने हे या समितीत असणार आहे. तसेच दुसरी समितीही ही संघटनात्मक समिती असणार आहे. यात राजेश पांडे यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी पक्षाचं संघटनात्मक काम पाहणार आहे.

भाजपचे पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुक संचालन समिती स्थापन केली आहे. यामध्ये भाजपचे इतर पदाधिकारी काम करतील. तसेच या दोन्ही पोटनिवडणुकीचा निर्णय निवडणूक कोअर कमिठी घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर उमेदवारांबाबत या बैठकीत अद्यापही कोणतीही चर्चा झाली नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासोबत आज चर्चा होणार आहे. त्यासाठी लांडगे आणि कोअर कमिटी पुण्यात जाणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर उमेदवारी निश्चित करण्याबाबत प्रदेशाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button