breaking-newsराष्ट्रिय

गणेश चतुर्थीला प्रसिद्ध मंदिरावर हल्ल्याचा होता कट, दहशतवाद्याला अटक

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने हिजबूल मुजाहिद्दीनच्या संशियत दहशतवाद्याला अटक केली आहे. गुरुवारी कानपूरमधून त्याला अटक करण्यात आली. दहशतवाद्याने गणेश चतुर्थीला एका प्रसिद्ध मंदिरावर हल्ल्याचा कट आखला होता. मात्र दहशतवाद विरोधी पथकाने वेळीच कारवाई करत त्याला अटक केली.

‘दहशतवाद्याचं नाव कामेर उज्जमान असून तो आसामचा रहिवासी आहे. 37 वर्षीय कामेर उज्जमान हिजबूल मुजाहिद्दीनचा सक्रीय सदस्य आहे’, अशी माहिती पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान त्याने हल्ला करण्याचा कट आखला होता. गुरुवारी संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली असून गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

कानपूरमधील चाकेरी परिसरातून अटक करण्यात आलेला कामेर आसाममधून बेपत्ता झाला होता. त्याच्या मोबाइलमधील व्हिडीओ तपासले असता तो शहरातील काही मंदिरांची रेकी करत असल्याचं समोर आलं आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.

कानपूर पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्या सहाय्याने दहशतवाद विरोधी पथकाने अटकेची कारवाई केली. ‘कामेर सोशल मीडियावर सक्रीय होता. त्याने एप्रिल २०१८ मध्ये एके-४७ हातात घेतलेला स्वत:चा फोटो शेअर केला होता. तेव्हापासूनच तो आमच्या रडारवर होता’, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे. कामेरचा तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

‘कामेर हा सुशिक्षित असून त्याला संगणकाचं चांगलं ज्ञान आहे. पण बीएच्या परिक्षेत तो नापास झाला होता. त्याने २०१७ मध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि नंतर हिजबूलमध्ये सहभागी झाला. २००८ ते २०१२ दरम्यान त्याने परदेशात वास्तव्य केलं होतं’, असं पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी सांगितलं आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button