TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

निगडीतील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण

पिंपरी : निगडी येथील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१६) रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे. महात्मा बसावेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महात्मा बसवेश्वर पुतळा समिती व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्राधिकरण निगडी येथे भक्ती-शक्ती चौक ते अप्पू घर रोड या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवारी (दि.१६) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे आदी उपस्थित राहणार आहेत.

शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवावा अशी मागणी लिंगायत समाजाकडून होत होती. यासाठी पुतळा समितीची निर्मिती करण्यात आली. या समितीने लोक वर्गणीतून महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बनवून घेतलेला आहे. बारा फूट उंचीचा हा पुतळा असून ब्रॉन्झ धातू ने बनवलेला आहे. ईस्टलिंग धारक असा हा पुतळा आहे. शिल्पकार पंकज तांबे यांनी हा पुतळा बनविला असून यासाठी २७ लाख रुपये खर्च आला आहे. महापालिकेने यासाठी जागा, सीमा भिंत, पुतळ्यासाठी चौथारा, सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था तसेच गार्डनचे काम करून दिले आहे.

यासाठी मनपा सल्लागार मे. शैलेश शहा यांची नियुक्ती केली होती. सदर पुतळा बसवणे कामी, पुतळा समितीने व महानगरपालिकेने शासनाच्या सर्व मान्यता प्राप्त केले आहे. त्यानंतर पुतळा समितीने म. बसवेश्वर महाराजांचा पुतळा महापालिकेकडे सुपूर्त केला आहे.

गेली सहा महिने सदरचा पुतळा हा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. त्यास शुक्रवारी (दि.१६) चा मुहूर्त मिळाला आहे. सायं ४ वाजता सदर पुतळ्याचे अनावरण होणार आहे. पुतळा समितीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आभार मानले. तसेच शहरवासियांनी या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहावे, अशी विनंती महात्मा बसावेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button