breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महाराजांचा पुतळा हटविणा-या कर्नाटकमधील भाजप सरकारच्या निषेधार्त डांगे चौकात निदर्शने

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कर्नाटकमधील भाजप सरकारने सुडबुध्दीच्या भावनेतून मनगुत्ती गावातील स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला. या घटनेमुळे भाजपच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याच्या निषेधार्त पिंपरी-चिंचवड युवक कॉंग्रेस, मराठा क्रांती मोर्चा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत थेरगाव येथील डांगे चौकात कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सध्या कोविड 19 च्या परिस्थितीत राज्य सरकारने घालून दिलेले नियम पाळणे प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक आध्यक्ष विशाल वाकडकर, मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सतिश काळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button