TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मोहनजी भागवत साहेब संघ मुख्यालयाचे कोपरे तपासा, उद्धव ठाकरेंनी दिला धोक्याचा इशारा!

मुंबईः नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे रेशीमबागेत गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सल्ला देत शिंदेंवर निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे रेशीमबागेत गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सल्ला देत शिंदेंवर निशाणा साधला आहे. ‘भागवत साहेब कोपरे-कोपरे तपासून बघा, कुठे लिंबं-टाचण्या पडल्यात का ते बघून घ्या. काल आमचं कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, आज आरएसएसच्या मुख्यालयावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला असेल. यांची नजर फार वाईट आहे, याचा अनुभव आम्ही घेतला. जे चांगलं आहे ते आपण नाही करू शकत, मग त्या चांगल्यावर कब्जा कसा मिळवायचा, ही त्यांची वृत्ती आहे. ही वृत्ती घातक आहे, त्यामुळे आरएसएसनेही काळजी घ्यायची गरज आहे,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, यावर कुणी बोलत नाही. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, यावर चर्चा होत नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ‘स्वत: मध्ये काही मिळवण्याची धमक नाही, दुसऱ्यांचं चोरायचं. महाराष्ट्रात टोळीचं राज्य आलं आहे, अशी भावना जनतेमध्ये व्हायला लागली आहे. काल आमच्या कार्यालयावर ताबा मिळवला, आज आरएसएस मुख्यालयात गेले होते, तिकडे ताबा मिळवू शकले नाहीत. आरएसएस मजबूत आहे, पण आरएसएसने सावध राहण्याची गरज आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button