TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

तोतया नौदल अधिकाऱ्याकडून महिलेची फसणूक

गृहपयोगी साहित्य स्वस्तात विकण्याचे आमीष दाखवून तोतया नौदल अधिकाऱ्याने महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी तोतया नौदल अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिलेने १७ ऑक्टोबरला फेसबुकवर एक जाहिरात पाहिली. त्यात नवीन विकत घेतलेले एसी, वॉशिंग मशीन आणि फर्निचर अत्यंत स्वस्त दरात तातडीने विकायचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या पोस्टमध्ये सर्व वस्तूंची छायाचित्रेही अपलोड करण्यात आली होती. महिलेने जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता एका व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने आपले नाव नारायण असल्याचे सांगून आपण नौदलात कार्यरत असल्याचे सांगितले.

त्याने आपली मुंबईहून बदली झाली आहे आणि त्याला त्याच्या घरातील वस्तू आणि फर्निचर वगैरे विकायचे आहे. त्याचे सर्व सामान विमानतळावर आहे, असे सांगितले. तक्रारदाराने एसी आणि वॉशिंग मशिन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नारायणने ते १५ हजार रुपयांना विकण्याचे मान्य केले. यानंतर नारायणने तिचा यूपीआय स्कॅन कोड व्हॉट्सअॅपवर पाठवला, त्यानंतर तक्रारदार महिलेने तिला २००० रुपये अॅडव्हान्स पाठवले. त्यानंतर नारायणने आपण संजय रावत नावाच्या व्यक्तीमार्फत वस्तू पाठवत असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेला रावत नावाच्या दूरध्वनीही आला. त्याने सांगितलेल्या वस्तू पोहोचवण्यासाठी सहा हजार १०० रुपयांची मागणी केली.

तक्रारदार महिलेने रक्कम पाठवली असता रक्कम मिळाली नसल्याचे सांगून रावतने अनेकवेळा रक्कम हस्तांतरीत करण्यास सांगितली. त्यानंतर रावतने विमानतळावरील जांभळे नावाचा एक अधिकारी सामान बाहेर काढेल. त्याला संपर्क साधून त्यालाही महिलेने रक्कम पाठवली. आरोपींनी वस्तू देताना अतिरिक्त रक्कमही परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तक्रारदार महिलेने दोन लाख सात हजार रुपये आरोपींना दिले. पण काही दिवसांनंतर आरोपींनी महिलेचा दूरध्वनी उचलणे बंद केले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने याबाबतची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९, ४२० आणि ३४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६(क) आणि ६६(ड)अंतर्गत गुन्हा दाखल केला. फेसबुकवर फसवणूक करणाऱ्या टोळीने महिलेची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button