पिंपरी / चिंचवड

विवाहितेचा छळ आणि गर्भपात प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

मनाप्रमाणे लग्न झाले नसल्याचे वारंवार म्हणत विवाहीतेकडे माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच तिचा गर्भपात करून छळ केला. याप्रकरणी पती सह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 जानेवारी ते 25 मे 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

पती आदित्य पांडुरंग काटे (वय 29), जाऊ (वय 30), दीर धीरज पांडुरंग काटे (वय 32, सर्व रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय पिडीत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आदित्य काटे यांच्यासोबत लग्न झाले. हे लग्न मनाप्रमाणे झाले नाही असे आरोपींनी वारंवार म्हणून विवाहितेला त्रास दिला. लग्न ठरवताना पतीचे शिक्षण बी कॉम झाले असल्याचे सांगून त्याचा सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय असल्याचे सांगत फिर्यादी यांची फसवणूक केली.

फिर्यादी विवाहिता पाच आठवड्यांची गरोदर असताना त्यांच्या इच्छे विरोधात त्यांचा गर्भपात केला. पतीला व्यवसायासाठी 10 लाख रुपये आई-वडिलांकडून आणण्याची आरोपींनी मागणी केली. पैसे न आणल्यास घटस्फोट देण्याची धमकी दिली. लग्नात फिर्यादीला दिलेले दागिने आरोपिंणीस स्वतःकडे ठेऊन त्यांना सासरी नांदवण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button