breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर!

मुंबई | राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवरांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ.अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंगवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संमतीने जनरल के सी वेनुगोपाल यांनी काढलं आहे.

जून २०२२ मध्ये राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. त्यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश होता. या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपने प्रसाद लाड या पाचव्या उमेदवार निवडून आणले होते. त्याचेवेळी काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. परंतु चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते.

हेही वाचा    –      शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

चंद्रकांत हंडोरे यांची कारकिर्द

१९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन, चंद्रकांत हंडोरे यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पुढे १९९२-९३मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईचे महापौरपदही मिळविले. पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. २००४ मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले, परंतु त्यांना अंतर्गत स्पर्धेत मंत्रिपद मिळू शकले नाही.

दरम्यान, अद्याप भाजपकडून राज्यसभेची यादी जाहीर झालेली नाही. पण महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातून एकच उमेदवार दिल्यामुळं भाजपकडून पाच उमेदवार दिलं जाण्याची शक्यता आहे. पण जर पुन्हा विधानपरिषदेसारखी निवडणूक भाजपला घडवून आणायची असेल तर भाजपकडून सहा उमेदवार दिले जाऊ शकतात. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार नाही तर त्याची निवडणूक होईल. त्यामुळं पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button