TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पोलीस उपनिरीक्षकाच्या लाच प्रकरणी मध्यस्थी करणाऱ्या जुन्नर तालुका बार असोसिशएनच्या अध्यक्षावर गुन्हा

बलात्काराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाखांची लाच मागणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक तसेच जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रशिक्षणार्थी (प्राेबेशन) पोलीस उपनिरीक्षक अमोल साहेबराव पाटील (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. जुन्नर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. केतनकुमार पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी तक्रारदाराच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन मंजुरीसाठी अहवाल (समरी रिपोर्ट) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. मात्र, कागदपत्रांतील त्रुटींमुळे अहवाल पुन्हा पाठविण्यात आला. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांची बदली झाली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.

बलात्काराच्या गुन्ह्यात पाटील यांनी तक्रारदाराचा जबाब पुन्हा घेतला. या प्रकरणात कलमवाढ होऊ शकते, अशी भीती उपनिरीक्षक पाटील यांनी तक्रारदाराला घालून त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर उपनिरीक्षक पाटील यांच्या वतीने ॲड. पडवळ यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला. या प्रकरणात मी मध्यस्थी करतो, असे ॲड. पडवळ यांनी तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने तक्रार नोंदविली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खातरजमा केली. तेव्हा उपनिरीक्षक पाटील आणि ॲड. पडवळ यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button