breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

संतोष सावंत हल्ला प्रकरणी नितेश राणेंचा जामीन रद्द करा; राज्य सरकारची हायकोर्टात याचिका

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील शिवसैनिक संतोष सावंत हल्ला प्रकरणी न्यायालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप खासदार नितेश राणे यांचा जामीन मंजूर केला. मात्र नितेश राणेंचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जामिनातील अटी-शर्तींचा भंग केल्याच्या आरोपाखाली राज्य सरकारने ही याचिका दाखल केली आहे, तसेच हायकोर्टाने या प्रकरणावरील सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

नेमकं प्रकरण काय?
सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष सावंत यांच्यावर 18 डिसेंबर 2021 ला जीवघेणा हल्ला झाला होता.संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून ते करंजे गावचे माजी सरपंच आहेत. दरम्यान त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केला. ज्यात परब गंभीर जखमी झाले. हा हल्ला नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये नितेश राणेंविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक 30 डिसेंबरला पार पडली, ज्यात नितेश राणे बिनविरोधात निवडून आले. या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांची पोलीस स्थानकात दोनदा चौकशी झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button