उद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आगामी काळात चांदीचा भाव चांगलाच वाढणार

चांदीचा भाव थेट अडीच लाख होणार?

मुंबई : सध्या सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ होताना पाहायला मिळत आहे. बाजार खुला झाला की हे दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वधारत आहे. चांदीचा भाव तर सोन्यापेक्षाही अधिक वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच चांदीमधील तेजी पाहून गुंतवणूकदार आपला मोर्चा चांदीकडे वाळवत आहेत. दरम्यान, सध्या सोने आणि चांदीमध्ये तेजी असली तरी भविष्यात हा कल कायम असेल का? असा प्रश्न विचारला जात आहे. याच प्रश्नाचे उत्तर काही तज्ज्ञांनी दिले आहे. या अंदाजानुसार आगामी वर्षात चांदी एका ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचणार असून गुंतवणूकदार मालामाल होण्याची शक्यता आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?
तज्ज्ञांच्या मते आगामी काळात चांदीचा भाव चांगलाच वाढणार आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात तर कोणी कल्पनाही केली नसेल, एवढा चांदीचा भाव वाढणार आहे. मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शियल सर्व्हिसेसने (MOFSL) ‘सिल्व्हर 2030- अभूतपूर्व वाढ’ नावाचा एक रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार चांदी दीर्घकालीन तेजीच्या काळातून जात आहे. 2027 सालात चांदीची किंमत सध्याच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच चांदी सध्याच्या 51 डॉलर्स प्रति औंसच्या तुलनेत 75 ते 77 डॉलर्स प्रति औंसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रुपयाच्या हिशोबाने अभ्यास करायचा झाल्यास सोने आगामी वर्षात तब्बल 2045 लाख रुपयांवर पोहोचू शकते.

हेही वाचा       :        “..तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा”; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला टोला 

गुंतवणूक केल्यास फायदा होणार का?
रतीयांसाठी सध्या सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले जात आहे. MOFSL च्या म्हणण्यानुसार आर्थिक वर्ष 2026-2027 मध्ये चांदी 2,45,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजेच सध्या सोन्यात गुंतवणूक केली तर आगामी वर्षभरात तुम्हाला फायदा होऊ शकतो. आजकाल चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. फक्त दागिने वगळता उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात चांदी या धातूचा वापर वाढतो आहे. त्यामुळेच भारतातील चांदीचे ईटीएफदेखील चांगली कामगिरी करत आहे. गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे. ऑगस्ट 2025 मध्ये चांदी ईटीएफमधील गुंतवणूक 180 टक्क्यांनी वाढली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button