UPI मध्ये होणार मोठा बदल; वापरकर्त्यावर नेमका काय होणार परिणाम?

New UPI Rules : अनेकजण डिजिटल पेमेंटचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात करत आहे. मात्र त्याच्या वाढता वापरासोबतच त्याची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI साठी एक नवीन नियम जाहीर केला आहे.
यूपीआयद्वारे पेमेंट करताना गुगल पे, फोन पे, पेटीएमवर आपल्या फोनमध्ये सेव्ह केलेले नाव दिसते. यामुळे अनेकदा फ्रॉड होण्याची शक्यता आहे. काही लोक फ्रॉड क्यूआर कोड बनवून देखील लोकांना लुटतात. त्यामुळेच एनपीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
नवीन नियमानुसार, आता यूपीआयद्वारे प्रत्येक ट्रान्झॅक्शन करताना त्या व्यक्तीचे तेच नाव दिसते जे बँक रेकॉर्डमध्ये रजिस्टर आहे. यामुळे फ्रॉड होण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्याचेच नाव दिसणार आहे. 30 जून नंतर हा बदल होणार असून, ज्याद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी, सिस्टम आपोआप यूझरचे अधिकृत बँकेत नोंदणीकृत नाव दर्शवेल.
हेही वाचा – शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता आता १२ फुटांचा; महसूल विभागाचा मोठा निर्णय
यूपीआयचे हे नियम दोन ट्रान्झॅक्शनवर लागू होणार आहे. एक म्हणजे पर्सन टू पर्सन (P2P)म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवतात तर त्याला त्या व्यक्तीचे नाव दिसते. दुसरे म्हणजे पर्सन टू मर्चंट (P2M) दुकानदाराला किंवा हॉटेलमध्ये पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला त्यांचेही नाव दिसणार आहे.
देशात UPI चा वापर वाढत असताना, बनावट नावे आणि QR कोडशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या नवीन नियमाचा उद्देश फसवणूक कमी करणे आणि डिजिटल पेमेंटची सुरक्षितता वाढवणे आहे. या निर्णयामुळे पैसे पाठवणारी व्यक्ती नोंदणीकृत नावाच्या मदतीने पैसे योग्य व्यक्तीच्या खात्यात जात आहेत की नाही हे तपासू शकेल.