Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अदानी समूहाला अमेरिकेतून दिलासा: ब्लॅकरॉकने घेतले 30% रोखे, विश्वासार्हता पुन्हा सिद्ध

नवी दिल्ली :  अदानी समूहाने गेल्या आठवड्यात 750 दशलक्ष डॉलरचे रोखे जागतिक गुंतवणूकदारासाठी खरेदी करण्याकरता उपलब्ध केले होते. यामधील सर्वात जास्त हिस्सा अमेरिकेतील ब्लॅकरॉक या गुंतवणूक कंपनीने विकत घेतला आहे.

अदानी समूहासंबंधात अमेरिकेतील न्याय विभागाकडून चौकशी चालू आहे. या समूहावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरपासून या कंपनीसंदर्भात अमेरिकेत नकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच अमेरिकेतील फंड व्यवस्थापन कंपनीने अदानी समूहाचे रोखे मोठ्या प्रमाणात विकत घेतले आहेत.

प्राप्त माहितीनुसार ब्लॅक रॉकने उपलब्ध रोख्यापैकी 30% रोखे विकत घेतले आहेत. त्यामुळे जागतिक भांडवल बाजारामध्ये अदानी समूहाची विश्वासार्हता पुन्हा पूर्वपदावर आली असल्याचे समजले जाते.

हेही वाचा –  रुग्णांच्या नातेवाईकांकडे अनामत रक्कम मागणे गैर नाही; पुण्यातील प्रकरणावर ‘आयएमए’ने व्यक्त केले मत

ब्लॅकरॉक कंपनी 12 लाख कोटी डॉलरचे व्यवस्थापन करते. अदानी समूहाचे रोखे तीन ते पाच वर्षाच्या मुदतीच्या आहेत. ब्लॅकरॉक कंपनीने अमेरिकेसह जागतिक पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याचे धोरण अवलंबविले आहे. ब्लॅकरॉक शिवाय अमेरिका आणि युरोपातील आणखी पाच फंड कंपन्यांनी डॉलरमधील हे रोखे विकत घेतले असल्याचे सांगितले जाते.

या घडामोडीनंतर अदानी समूहाने समाधान व्यक्त केले आहे. आमच्यावर जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास अजूनही कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात अधिक ताकतीने काम करीत राहणार असल्याचे सांगण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button