Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलसह सीएनजीच्या दरातही मोठी वाढ

Petrol Diesel Price Hike | आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट फटका भारतीय ग्राहकांना बसला आहे. शनिवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली. आज पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे.

या ताज्या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

१० दिवसांत तब्बल ५ रुपयांची दरवाढ

याआधी १६ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ केली होती. त्यानंतर १९ मे रोजी सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुन्हा ९० पैशांची दरवाढ झाली होती. आज (शनिवारी) झालेल्या ताज्या वाढीसह गेल्या अवघ्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तब्बल ५ रुपयांनी महागले आहे.

हेही वाचा

आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी दरातही १ रुपयाची वाढ

एककीडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत असताना दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरातील ही गेल्या १० दिवसांतील तिसरी दरवाढ आहे. या ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीचा दर ८१.०९ रुपये प्रति किलो असेल, तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर ८९.७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. यापूर्वी सरकारने १५ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपयांनी आणि त्यानंतर १८ मे रोजी पुन्हा १ रुपयाने वाढ केली होती.

अफवांवर विश्वास ठेवू नका; केंद्र सरकारचे आवाहन

पश्चिम आशियातील युद्धाच्या परिस्थितीमुळे देशात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होणार, अशी भीती आणि अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, “देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये आणि पेट्रोल पंपांवर गर्दी (Panic Buying) करू नये. केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. काही पेट्रोल पंपांवर निर्माण झालेला तात्पुरता ताण दूर करण्यासाठी तेल कंपन्यांकडून सतत देखरेख आणि समन्वय सुरू आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button