Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमुंबई

अरेरे! पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड महागाईचा सामना करावा लागतोय. आता तेल उत्पादक कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरवाढीला ब्रेक दिल्यानंतर आज शुक्रवारी इंधनाच्या दरांत वाढ केली आहे. देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल 28-29 आणि डिझेल 28-30 पैशांनी महागले आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 95.85 आणि 86.75 रुपयांवर पोहोचले असून मुंबईतही पेट्रोलच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल तब्बल 102.04 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलचे दर 94.15 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या धर्तीवर 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात होते. मात्र निवडणुकांचा काळ लोटल्यानंतर इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. दरम्यान, सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रतिलिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रतिलिटर इतका कर लागतो. तर राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते आणि डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. तसेच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर 3 रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button