Breaking-newsआंतरराष्ट्रीयउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमुंबई

जागतिक स्तरावर MIT कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदीचा झंकार!

‘ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर इनोव्हेशन 2025’ मध्ये टॉप १०० मध्ये घवघवीत यश

पिंपरी | MIT कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (पुणे) या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेने जागतिक स्तरावर आपली ठसा उमटवत ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर इनोव्हेशन 2025 मध्ये तिन्ही प्रमुख श्रेणींमध्ये टॉप १०० रँकिंगमध्ये स्थान मिळवून अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

या मानांकनात संस्था मूल्ये आणि संस्कृती या श्रेणीत ७ वे जागतिक स्थान, विद्यार्थी सहभाग आणि सहाय्य या श्रेणीत ४७ वे स्थान, तर उद्योजकता वृत्ती या श्रेणीत ५३ वे स्थान मिळवून संस्थेने जागतिक स्तरावर आपली नाविन्यपूर्ण, मूल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धती सिद्ध केली आहे.

हेही वाचा     :      एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

या यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. बी. बी. वाफरे, उपसंचालिका अक्षदा कुलकर्णी, उपसंचालिका मानसी अतीतकर, कुलसचिव डॉ. शरद कदम, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यमान विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व हितधारक यांचे संयुक्त योगदान अतुलनीय आहे.

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नकाशावर ओळख…

या घवघवीत यशामागे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील कराड यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि प्रेरणादायी मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. तसेच, ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर इनोव्हेशन या मानांकनाच्या प्रस्तावाच्या तयारीसाठी प्रा. अभिजीत नेटके यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. ही यशस्वी झेप हे MIT महाविद्यालयाच्या मूल्याधारित, नवोन्मेषशील आणि विद्यार्थीनिष्ठ शिक्षणदृष्टीकोनाचे फलित असून, सर्व घटकांच्या एकत्रित आणि समर्पित प्रयत्नांची साक्ष आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे आळंदीतील ही संस्था केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button