रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय ; रविवारी ३१ मार्चला बँक सुरु राहणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/महायुतीची-राज-ठाकरेंना-ऑफर-1-780x470.jpg)
RBI : रविवारी बँका सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार आहेत. १ एप्रिलच्या दिवशी सोमवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील RBI ने घेतला आहे.
३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार असून, वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना भरपूर काम आहे. त्यामुळं ३१ मार्चला बँका सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार असला तरी नियमित वेळेनुसारच बँका उघडतील. ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. पण , यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.असं ही सांगितलं आहे.
हेही वाचा – ‘रूपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते’; जितेंद्र आव्हाडांची टीका
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी रविवारी बँका सुरु राहणारआहे. आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्यामुळं बँका सुरु राहणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चला भारत सरकारशी संबधीत असणाऱ्याच सर्व बँका सुरु राहणार आहेत.
या दिवशी सर्व बँका खुल्या असल्यामुळं वर्षातील आर्थिक व्यवहार सगळे पूर्ण होतील असं RBI ने म्हटलं आहे. देशात १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच होळीचा सण आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी या दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं या आठवड्यात बँका कामकाज पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत आहे. त्यामुळं रविवारी बँका सुरु राहणार आहे.