breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘रूपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते’; जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. माहेरी किती लुडबूड करावी, यालादेखील मर्यादा असतात, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मवर एक मोठी पोस्ट लिहीली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना, “माहेरी किती लुडबूड करावी, यालादेखील मर्यादा असतात”, असं म्हणत तमाम स्त्री वर्गाचा अपमान केला आहे. आजच्या काळात स्री-पुरुषांमध्ये भेद राहिलेतच कुठे? अन् हे भेद नष्ट व्हावेत, यासाठी तर लढाई चालू असते. शरद पवार यांनी महिलांना दिलेले ५० टक्क्यांचे आरक्षण कशासाठी होते? राजकारणात मिळालेली संधी कशासाठी होती? याचं उत्तर आहे की, महिलाही पुरूषांइतक्याच कर्तबगार असतात आणि त्यांची कर्तबगारी सिद्ध करता यावी, या भावना शरद पवार यांच्या होत्या आणि आहेत. त्याच शरद पवार यांच्या मदतीसाठी त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी जर सुप्रिया सुळे लढत असतील, संघर्ष करीत असतील तर त्यास ‘लुडबूड’ म्हणून संबोधल्याने रुपाली चाकणकर यांच्या बुद्धीचीच किव येते.

हेही वाचा    –    सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश 

एखाद्या मुलीला ती केवळ मुलगी आहे अन् ती सासरी गेली आहे, म्हणून तिचा माहेरचा अधिकार नाकारणे, हा प्रकार राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अपमानच आहे. त्यामुळे जर आपले असे विचार असतील तर यापुढे किमान महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार तरी अर्पण करू नका. जर तुमचे विचार हजारो वर्षांपूर्वीचे किंवा जुनाट असतील आणि स्री-पुरूष भेदभाव तुम्ही आजही मानत असाल तर तुमची किवच करावीशी वाटते.

केवळ ‘ती’ मुलगी आहे, म्हणून तिचे अधिकार नाकारणाऱ्या काळातील तुम्ही आहात. त्याचवेळी इथे आमच्यासारखे वंशाला दिवा आहे किंवा नाही, असा विचार न करता, एका मुलीवरच समाधान मानून तिलाच सर्व अधिकार देणारे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे; आणि हो, जेवढं कौतूक आईपुढे ढाल म्हणून उभे राहणाऱ्या राहुल यांचे केले जाते; तेवढेच कौतुक आम्हा सर्वांना सुप्रिया सुळे यांच्याविषयी आहे. ज्या मुलीच्या बापाने आपुलकीने स्वकियांना आणि परकियांना मोठे केले आणि ज्यांना मोठे केले; त्यांच्याकडूनच ‘तिच्या’ पित्याला घाव सोसावे लागत आहेत. अशा वादळात… रणसंग्रामातही सुप्रिया सुळे समर्थपणे खडकाप्रमाणे उभ्या राहून संघर्ष करत आहेत. ही जिजाऊंची लेक आहे, ही अबला नारी नाही. सासर आणि माहेर या कल्पना आता इतिहासजमा झाल्या आहेत.

दुर्दैवाने आपण ज्या आयोगाच्या अध्यक्षा आहात. त्या आयोगाच्या प्रमुख असतानाही आपण अशा भेदभावाच्या भावना बाळगत असाल तर स्री अत्याचाराविषयी आपल्या काय भावना असतील, याचा विचारच न केलेला बरा! असो, यापेक्षा अधिक काही लिहिण्यात काही अर्थ नाही, असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button