उद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमुंबई

अंबानींच्या हातातून निसटली आणखी एक कंपनी

कर्जात बुडालेल्या हिंदुजा समूहाकडून टेकओव्हर

मुंबई : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड उथळपालट चालू असताना रोज एक नवीन धक्का समोर बसत आहेत. मार्केटची स्थिती आणखी खालावत असताना अनेक गुंतवणूकदारांचे बरेच नुकसान झाले. तर आता अलीकडेच देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

अनिल अंबानींच्या कंपनी विक्रीचा माग मोकळा
अनिल अंबानींच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असताना रिलायन्स कॅपिटलच्या मालकी हक्कासाठी बोली लावणारे कंपनीचे नवीन मालक हिंदुजा समूहाला रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी विमा नियामक IRDAI (IRDAI) ची मंजुरीसहा कंपनी ताब्यास घेण्याची सुद्धा परवानगी मिळाली आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणाचा मार्ग मोकळा
अनिल अंबानींच्या दिवाळखोर रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या अधिग्रहणासाठी हिंदुजा समूहाची इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज (IIHL) दीर्घकाळापासून IRDAI (इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया)च्या मंजुरीची वाट पाहत होती ज्यामुळे प्रक्रियेला विलंब होत होता. रिलायन्स कॅपिटलच्या विमा शाखेत संपूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्सचे संपादन समाविष्ट होते. या संदर्भात IIHL च्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले, “IRDAI कडून मान्यता मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. तथापि अद्याप वैधानिक आणि न्यायिक मान्यता/पालनांच्या अधीन आहे”.

रिलायन्स कॅपिटलवर भरमसाठ कर्जाचा भार
रिलायन्स कॅपिटलबाबत नोव्हेंबर २०२१ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) मोठी बातमी आली होती की प्रशासकीय समस्या आणि कंपनीने पैसे न दिल्याच्या आरोपांमुळे आरबीआयने कंपनीचे बोर्ड बरखास्त केले. केंद्रीय बँकेने कंपनी ताब्यात घेण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये निविदा मागवून प्रशासक म्हणून नागेश्वर राव वाय यांची नियुक्ती केली होती. रिलायन्स कॅपिटलवर ४०,००० कोटी रुपयांचे कर्ज होते आणि चार अर्जदारांनी सुरुवातीला रिझोल्यूशन प्लॅनसह बोली लावली होती परंतु कर्जदारांच्या समितीने कमी किमतीसाठी या सर्व बोली नाकारल्या आणि तेव्हापासून ही प्रक्रिया सतत विलंब होत गेली.

NCLT ची आधीच मंजुरी
यापूर्वी जून २०२३ मध्ये हिंदुजा ग्रुप फर्मची समितीने ९,६६१ कोटी रुपयांच्या आगाऊ रोख बोलीसाठी निवड केली. रिलायन्स कॅपिटलची ५०० कोटी रुपयांची अतिरिक्त रोख रक्कमही कर्जदारांकडे जाईल तर अनिल धीरूभाई अंबानी समुहाची वित्तीय सेवा शाखा ९,६५० कोटी रुपयांना विकत घेण्याच्या कराराला बँकिंग आणि भांडवली बाजार नियामक व निःपक्षपाती वॉचडॉग CCI यांच्या समावेशासह इतर सर्व वैधानिक मान्यता आधीच प्राप्त झाल्या आहेत.

अशोक हिंदुजा काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी हिंदुजा समुहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी सांगितले होते की, “मॉरिशसस्थित IIHL कर्जदारांना IRDAI ची मंजुरी मिळाल्याच्या ४८ तासांत पैसे देईल आणि या करारासाठी ७,५०० कोटी रुपयांच्या कर्ज निधी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. उर्वरित दोन हजार कोटी रुपयांची रक्कम IIHL कडून इक्विटी म्हणून प्राप्त होईल ज्यामध्ये हिंदुजा समूहाचा ९.९% हिस्सा आहे”.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button