breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

1 जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

1 जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये बँकांची खाती गोठवण्यापासून ते एटीएम शुल्क वाढवण्यापर्यंतचा समावेश आहे.

तर, बदलणारे नियम हे कोणते असार आहेत ते पाहुयात…

1… बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ग्राहकांना केवायसी उपलब्ध करून द्यायचा एसएमएस पाठवला आहे.ज्या ग्राहकांनी त्यांचा केवायसी बँकेला दिलेला नाही, अशी खाती १ जुलैपासून गोठवण्यात येणार आहे… केवायसीसाठी ग्राहकांना बँकेला आधारकार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे.

2… देशातली दुसरी सगळ्यात मोठी बँक असलेल्या पीएनबीने त्यांच्या बचत खात्याच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. १ जुलैपासून सगळ्या बचत खात्यांच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. १ जुलैपासून ग्राहकांना ३.२५ टक्के एवढाच व्याजदर मिळेल.

3…एटीएममधून पैसे काढल्यावर ग्राहकांना काही काळ शुल्क भराव लागत नव्हत..ती सूट आता संपणार आहे…. लॉकडाऊनदरम्यान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क लावणं थांबवलं होतं. १ जुलैपासून मात्र पुन्हा एकदा एटीएममधून पैसे काढल्यावर ग्राहकांना शुल्क भरावं लागणार आहे. केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत कोणत्याही एटीएममधून १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठीचं शुल्क हटवलं होतं. 

4… १ जुलैपासून खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवल्यास त्यावरजो दंड आकारण्यात येत असतो त्या दंडाची रक्कम आता आकारली जाणार नाहीये. म्हणजेच आता ग्राहकांना बँक खात्यांमध्ये कमीत कमी रक्कम ठेवणं गरजेचं नसणार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button