रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलं ऑक्टोबर महिन्यातील बॅंकाच्या सुट्ट्यांंचे वेळापत्रक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bank-1601293806.jpg)
ऑक्टोबर महिन्यात विविध सण आणि उत्सव येत असल्याने अनेक सुट्ट्या येत आहेत, अर्थात लॉकडाऊनमुळे सर्वांंना घरी राहणे अनिवार्य आहे. मात्र जर का बॅंकेची महत्त्वाची कामंं असतील तर ती या सुट्ट्यांंचा कालावधी बघुन उरकुन घेण गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी बॅंंक बंंद असतील यासंंदर्भात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती देत ऑक्टोबर महिन्यातील बॅंकाच्या सुट्ट्यांंचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या मध्ये काही दिवस हे शनिवार व रविवारला जोडुन आल्याने मोठे विकेंंड बॅंक व्यवहार बंंद असतील गैरसोय टाळण्यासाठी हे वेळापत्रक पाहण महत्त्वाच आहे.
या वेळापत्रकाविषयी महत्वाची माहिती म्हणजे, यातील नॅशनल हॉलिडे म्हणजेच 2 ऑक्टोबर (महात्मा गांंधी जयंती). 26 ऑक्टोबर (दसरा) हे सर्व राज्यात लागु असतील, तर काही सुट्ट्या या प्रादेशिक असुन त्या संबंधित राज्यात लागु केल्या जाणार आहे.
2020 ऑक्टोबर महिन्यात यादिवशी बंंद असणार बॅंक
- 02 ऑक्टोबर- शुक्रवार, महात्मा गांधी जयंती
- 04 ऑक्टोबर -रविवार
- 08 ऑक्टोबर- गुरुवार, चेल्लम प्रादेशिक सुट्टी
- 10 ऑक्टोबर -दुसरा शनिवार
- 11 ऑक्टोबर -रविवार
- 17 ऑक्टोबर- शनिवार, आसाममधील कटी बिहू
- 18 ऑक्टोबर- रविवार
- 23 ऑक्टोबर- शुक्रवार, महासप्तमी प्रादेशिक सुट्टी
- 24 ऑक्टोबर- शनिवार, महाष्टमी प्रादेशिक सुट्टी
- 25 ऑक्टोबर- रविवार
- 26 ऑक्टोबर- सोमवार, विजया दशमी
- 29 ऑक्टोबर- गुरुवार, मिलाद-ए-शरीफ, प्रादेशिक सुट्टी
- 30 ऑक्टोबर -शुक्रवार, ईद-ए-मिलाद
- 31 ऑक्टोबर – शनिवार, महर्षी वाल्मिकी, सरदार पटेल जयंती, प्रादेशिक सुट्टी
दरम्यान, वरील यादी मध्ये सण आणि उत्सवाच्या सोबत नियमित दुसरा व चौथा शनिवार पकडुन सुट्ट्यांंचे दिवस देण्यात आले आहेत. या दिवशी बॅंक प्रत्यक्ष बंंद असल्या तरी ऑनलाईन बॅंकिंंग, नेट बॅंकिंंगचा पर्याय युजर्सच्या साठी सुरु असतील.