मोदींच्या पॅकेजच्या घोषणेनंतर शेअर बाजारात काय झाल पहा…
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसागमिक वाढतच चालला आहे. आणि त्याचा परिणाम आर्थिक व्यवस्थेवर बसला आहे. त्यामूळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काल (१२ मे) पंतप्रधानांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात १००० अंकांची उसळी घेत निर्देशांक ३२,३०६.५४ वर पोहोचला होता.
कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू झाले असले, तरी रोजगारनिर्मिती करणाऱ्या विविध उद्योगांसाठी केंद्राने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात गेल्या आठवडय़ात निरनिराळ्या क्षेत्रांतील प्रतिनिधींशी चर्चाही केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची सविस्तर माहिती आज (१३ मे) केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून निरुत्साह पसरलेल्या शेअर मार्केटवर दिसून आला. मोदींच्या पॅकेजचं स्वागत करत शेअर बाजारानं पहिल्या सत्राच्या सुरूवातीलाच उसळी घेतली. सेन्सेक्सनं ९३५.४२ अंकांची झेप घेतली. निफ्टीही वधारला असून, २३० अंकांची वाढ होत ९,४०० वर पोहोचला आहे.