पेट्रोल-डिझेल दरात घसरण…
आज म्हणजे 1 ऑक्टोबरला पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दरात कपात केली आहे. तर मागील ९ दिवसांत पेट्रोलची किंमत स्थिर आहे. विविध देशांमध्ये पुन्हा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चिंता वाढल्या. परिणामी क्रूडच्या अर्थकारणावरही परिणाम झाला आहे.
कोरोना संकट रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीनं जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणीवर मोठा परिणाम झाला होता. किमती शून्याखाली गेल्यानंतर कच्च्या तेलाची बाजारपेठ अद्याप सावरलेली नाही. जवळपास महिनाभरापासून तेलाचे दर ४० डॉलरच्या आसपास असल्याने देशांतर्गत कंपन्यांनी इंधन दर कपातीचे सत्र सुरु ठेवले आहे. आज डिझेलमध्ये १० पैसे कपात झाली.
गेल्या आठवड्यात तीन दिवस दर कपातीला विश्रांती दिल्यानंतर कंपन्यांनी देशभरात डिझेल दर कपातीचे सत्र सुरु ठेवले होते. आज पुन्हा कंपन्यांनी डिझेल दरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.९३ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.५३ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७६.०१ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.०५ रुपये प्रती लीटर आहे.
तर, पेट्रोवरचे भावही कमी झाले आहेत. मुंबईत ३ सप्टेंबर रोजी पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.७३ रुपये कायम आहे. डिझेलचा भाव ७९.९४ रुपये झाला आहे. त्याआधी २ सप्टेंबर रोजी डिझेलचा भाव ८०.११ रुपयांवर होता. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७७.०४ रुपये इतका खाली आला आहे. दर कपातीने डिझेल महिनाभरात सरासरी ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे.