Breaking-newsआंतरराष्ट्रीयउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

देशांतर्गत मागणीच अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी पुरेशी, सर्वात वाईट काळ संपला

अर्थव्यवस्थेची घसरण जेवढी व्हायची होती तेवढी झाली आहे. आता तीत वाढ होईल. लॉकडाऊन आणि अनलॉकच पाहा. प्रत्येक अनलॉकमध्ये स्थितीत सुधारणा होत आहे. भारतात स्वत:ची देशांतर्गत मागणी मोठी आहे. ती अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुरेशी आहे. असोचेम ही उद्योग संघटना आणि नारडेको या रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

ते म्हणाले की, कोरोनामुळे चीनविरुद्ध जगात नकारात्मक भावनेची लाट आहे. त्यामुळे अनेक कारखाने चीनमधून बाहेर पडतील. तेथे अनेक कारखाने बंद झाले आहेतच. त्यापैकी बहुतांश व्हिएतनामला तर काही बांगलादेशमध्ये गेले. आता अशा कारखान्यांना आकर्षित करण्यासाठी ईझ ऑफ डुइंग आणखी चांगले करावे लागेल. धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीला वेग द्यावा लागेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button