डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी कपात, पेट्रोलचे दर मात्र स्थिर
![After 3 days, fuel became expensive again; Petrol in Parbhani is Rs 110 per liter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/petrol-diesel_2017086116.jpg)
मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे देशातील इंधन दरामध्ये बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, पेट्रोलच्या किमतींमध्ये काहीच बदल झालेले नाहीत, परंतु, डिझेलच्या दरांमध्ये सलग चौथ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या किमतीमध्ये कपात केली आहे.
आज डिझेलच्या किमतींमध्ये वेगवेगळ्या देशांत 9 पैशांपासून 10 पैशांपर्यंत घट झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पेट्रोलच्या किंमतीत काहीच घट केलेली नाही. आज राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचे दर 9 पैशांनी कमी होऊन 70.71 रुपये प्रति लीटरवर आले आहेत. तर पेट्रोलच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नसून पेट्रोलचे दर 81.06 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत.
मुंबईत पेट्रोलचे दर 87.74 रुपये प्रति लीटर एवढे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. तसेच डिझेलच्या किमतींत 10 पैशांनी घट झाली असून 77.12 रुपये प्रति लीटर एवढी किंमत आहे.
कोलकत्तामध्ये डिझेलच्या किंमतीत 9 पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर 74.23 रुपये प्रति लीटर एवढा आहे. याव्यतिरिक्त पेट्रोलच्या किंमतीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसून पेट्रोलची किंमत 82.59 रुपये प्रति लीटर एवढी आहे.
तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून पेट्रोलचे दर 84.14 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत. तसेच डिझेलच्या दरांत 9 पैशांची कपात करण्यात आल्यामुळे डिझेलचे दर 76.18 रुपये प्रति लीटर एवढे आहेत.