गुगलकडून मोठी घोषणा, फेसबुकचा पासवर्ड चोरणारे 25 अॅप्स बॅन ग्राहकांच्या सुरक्षेसाठी प्ले स्टोर वरुन अॅप्स हटवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/google-facebook-new6-1920.jpg)
मुंबई । फेसबुक हा सोशल मीडिया मधला अविभाज्य असा घटक आहे. आज प्रत्येक जण फेसबुकचा वापरकर्ता आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक व्यतिरिक्त इतरही अॅप्स असतात, पण तुम्हाला माहिती आहे का हे अॅप्स तुमच्या फेसबुकचे पासवर्ड सुद्धा चोरतात. म्हणुनच गुगलने प्ले-स्टोर वरुन अशा हॅकिंग अॅप्सला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या 25 अॅप्सचे भारतात 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहे. तुमच्या मोबाईल मध्ये असेल हे अॅप्स तर लगेच करा डिलीट आणि आपले फेसबुक सुरक्षित ठेवा.
हे अॅप्स गुगलकडून हटविण्यात आले आहे :
1.सुपर वॉलपेपर फ्लॉशलाईट
2.पेडेनटेफ
3.वॉलपेपर लेवल
4.कॉन्टूर लेवल वॉलपेपर
5.आयप्लेयर अॅड आयवॉलपेपर
6.व्हिडीओमेकर
7.कलर वॉलपेपर
8.पेडोमीटर
9.पावरफुल फ्लॉशलाईट
10.सुपर ब्राइट फ्लॉशलाईट
11.सुपर फ्लॉशलाईट
12.सॉलिटायर गेम
13.एक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्युआर कोड
14.क्लासिक कार्ड गेम
15.जंक फाइल क्लिनिंग
16.सिंथेटीक झेड
17.फाइल मॅनेजर
18.कम्पोझिट झेड
19.स्क्रीनशॉट कॅप्चर
20.डेली होरोस्कोप वॉलपेपर
21.वॉक्सिया रीडर
22.प्लस वेदर
23.एनाइम लाईव्ह वॉलपेपर
24.आय हेल्थ स्टेप काऊंटर
25.कॉंम टाइप फिक्शन