कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीची मागणी वाढली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture-88.jpg)
कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. करोना संकट काळात सोने आणि चांदीने उच्चांकी गाठली होती. मात्र त्यानंतर झालेल्या नफावसुलीने सोने ५० हजारांपर्यंत खाली आले.
देशांतर्गत कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाली आहे. आज मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने ५०१६० रुपयांवर ट्रेड करत असून चांदीचा भाव एक किलोला ६०६२० रुपये झाला आहे. सोने ३० रुपयांनी तर चांदी २३६ रुपयांनी वाढले आहे.
याआधी सोमवारी बाजार बंद होताना सोने ५०२ रुपयांनी महागले होते. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९६५० रुपयांवर बंद झाला. चांदीमध्येही १३६१ रुपयांची वाढ झाली होती. चांदीचा भाव एक किलोला ५९०२७ रुपये झाला. सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. चीनमधील औद्योगिक उत्पादनात वाढ आणि युरोपातील बँकांकडून आर्थिक पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता असल्याने जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींना फायदा झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.