breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

कमॉडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण

कमॉडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. संध्याकाळी ६ वाजता मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ५०४०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यात १४२ रुपयांची घसरण झाली. चांदीच्या किमतीतसुद्धा १४०० रुपयांची घसरण झाली असून एक किलोचा भाव ६०२०० रुपये झाला आहे.


goodreturns या वेबसाईटनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०५५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९२६० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३७४० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९७४० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२७६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२७५० रुपये आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजात दमदार वाढ झाल्याने मौल्यवान धातूंच्या दरांवर दबाव आला. चीनमधील औद्योगिक कामकाजात वाढ झाल्याने विदेशातील मागणीही वाढली. परिणामी संतुलित आर्थिक सुधारणेची शक्यता दिसून आली. गुंतवणूकदारांची जोखिमीची भूक वाढल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button