एका वर्षाला ४० लाख सायकल बनवणारी अॅटलास कंपनी बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/atlascycle.jpg)
गाजियाबाद | देशातील नामांकित असलेली सायकल कंपनी अॅटलासने आपला सर्वात मोठा कारखाना बंद केला आहे. यामुळे, हजाराहून अधिक मजुरांच्या संसारावर बेरोजगाराची कुऱ्हाड पडली आहे. कंपनीने आर्थिक संकटाचे कारण देऊन कारखाना बंद केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की यापुढे त्यांच्याकडे कंपनी चालवण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत. दरम्यान सर्वात महत्वाचे म्हणजे आज जागतिक सायकल दिन आहे आणि या दिवशीच भारताची एक प्रसिद्ध सायकल कंपनी बंद होत आहे.ही मोठ्या खेदाची बाब समोर आली आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साहिबाबाद येथे असलेल्या सर्वात मोठ्या कारखान्यावर अॅटलास सायकल्स (हरियाणा) लिमिटेडने नोटीस लावलेल्या नोटीसमध्ये कंपनीने म्हटले आहे की,आम्ही बर्याच वर्षांपासून एक प्रचंड आर्थिक संकटातून जात आहोत. आमचे सर्व फंड खर्च झाले आहेत. आमच्याकडे आता उत्पन्नाचा दुसरा स्रोत उरलेला नाही. दैनंदिन खर्चासाठी पैसेही नाहीत. जोपर्यंत पैसा व्यवस्थापित होत नाही, तोपर्यंत कच्चा माल देखील खरेदी करता येणार नाही.
कंपनीने असे म्हटले आहे की अशा परिस्थितीत आम्ही कंपनी चालवू शकत नाही.अशा परिस्थितीत संचालक कारखाना चालवण्याच्या स्थितीत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी ३ जूनपासून ले-ऑफ करावं.अशी विनंती देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना केली आहे.त्यामुळे कोरोना सारख्या महाभयंकर परस्थिती सायकल कंपनीचे कर्मचारी चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.