ई-कॉमर्स कंपन्यांची सूटमधून माघार,फक्त जीवनावश्यक वस्तूंची होणार विक्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-117.png)
केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला स्थगिती दिली आहे. चार दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मोबाइल फोन, रेफ्रिजरेटर आणि रेडिमेड कपड्यांच्या विक्रीला परवानगी दिली होती. परंतु, आता ही सूट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर केवळ जीवनावश्यक वस्तूच मिळतील. राष्ट्रव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत चालणार आहे.
यापूर्वीच्या आदेशात म्हटले होतं की, ई-कॉमर्स कंपन्या २० एप्रिलपासून या वस्तूंची विक्री करु शकतील. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले. यात बिगर जीवनावश्यक उत्पादनांची विक्री केली जाऊ नये असे म्हटले आहे.
यापूर्वी देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी चर्चा सुरु होती. सध्या किराणा आणि औषधांची दुकाने सुरु आहेत. तर दुसरीकडे काही आवश्यक साहित्यांची होम डिलेव्हरीही केली जात आहे.