TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

तळेगावमधील मावळ नागरी सहकारी पतसंस्थेत ८२ लाखांचा गैरव्यवहार, दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील मावळ नागरी सहकारी पतसंस्थेत माजी व्यवस्थापक आणि वरिष्ठ लिपिक महिलांनी ८२ लाख २३ हजार ४५९ रुपयांचा गैरव्यवहार केला. हा प्रकार ते सन २०१६ ते २०१९ या कालावधीत घडला. याप्रकरणी लेखापरीक्षक रोहित राजेंद्र पाटील यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पाटील यांनी तळेगाव दाभाडे येथील मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे सन २०१६ ते २०१९ या सालचे वार्षिक वैधानिक लेखापरीक्षण केले. दरम्यान, या लेखापरीक्षणा दरम्यान पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापक महिला आणि वरिष्ठ लिपिक महिला या दोघींनी आपसांत संगनमत करून अपहार केल्याचे समोर आले.
आरोपी महिलांनी एकूण ७२ लाख ३९ हजार १९३ रुपये आणि रोख रकमेतील नऊ लाख ८४ हजार २६६ रुपये याप्रमाणे एकूण ८२ लाख २३ हजार २५९ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button