Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयराष्ट्रिय

“…म्हणून मी ट्रम्प यांचं अमेरिका भेटीच निमंत्रण नाकारलं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं कारण

PM Modi rejects Trump invite : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या वॉशिंग्टन भेटीच्या निमंत्रणाला नकार दिला होता. नियोजित दौरे असल्यामुळे अमेरिकेला भेट देता येणार नाही, असे उत्तर त्यांनी दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे. ओडिशामधील भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबाबत भुवनेश्वर येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना मोदी यांनी भेट नाकारण्याचे कारण स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी कॅनडामध्ये जी७ परिषदेसाठी गेलो होतो. तिथे मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला. ते म्हणाले, तुम्ही कॅनडामध्ये तर आलाच आहात. तर वॉशिंग्टनमध्येही या. एकत्र जेवण आणि चर्चा करू. त्यांनी मला आदराने निमंत्रण दिले. मी त्यांना म्हणालो, आपल्या निमंत्रणासाठी आभारी आहे. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. पण मला महाप्रभूच्या भूमीत जायचे आहे. यासाठी मी ट्रम्प यांच्या निमंत्रणाला नम्रतापूर्वक नकार दिला. प्रभू जगन्नाथ यांची भक्ती मला इथे घेऊन आली, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा –  दापोडी येथे नदीत पडलेल्या मुलाचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले

जाहीर सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, भाजपा सरकारने ओडिशामधील जनतेची मागणी पूर्ण करत पूरी जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे, तसेच रत्न भंडार पुन्हा उघडले आहे. भाजपा सरकराने सुसाशन आणि सार्वजनिक सेवा मागच्या वर्षभरात यशस्वीरित्या पुरविल्या आहेत.

जी७ बैठकीचे यजमान पद यंदा कॅनडाकडे होते, त्यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बैठकीला उपस्थित होते. या परिषदेतून डोनाल्ड ट्रम्प लवकर निघून गेले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच फोनवर संवाद झाला होता.

या संवादाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारले की तुम्ही कॅनडावरून परतत असताना अमेरिकेला येऊ शकता का? मात्र, मोदी यांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमांचे कारण सांगत अमेरिकेला जाण्यास असमर्थता दर्शवली”.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button