breaking-newsराष्ट्रिय

TCS कंपनी देणार ४० हजार तरूणांना रोजगार

मुंबई : कोरोनाच्या काळात रतन टाटा हे आपल्या देशाकरता ‘देवदूत’च ठरले. आता पुन्हा एकदा त्यांनी आपलं हे वेगळेपण अधोरेखित केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कपात केले. असं असताना आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने कोरोनाच्या संकटातही कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. 

टीसीएसने देशभरातील कॅम्पसमध्ये फ्रेशर्सकरता ४० हजार नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने देशभरातून फ्रेशर्सकरता कॅम्पस प्लेसमेंट केलं होतं. यंदा कोरोनाच्या संकटातही कंपनी नोकऱ्या देणार आहे. टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी ही माहिती दिली. 

जून तिमाहीचे निर्णय घोषित केल्यानंतर गोपीनाथन यांनी सांगितलं की, कोरोनामुळे गेल्या तिमाहीत आम्ही असं जाहीर केलं होतं की फ्रेशर्सची भर्ती थांबवण्यात येत आहे. मात्र ज्यांना ऑफर लेटर देण्यात आले होते त्यांची भर्ती होणार आहे. 

जून तिमाहीमध्ये देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्टर कंपनीने नेट प्रॉफिटमध्ये १३ टक्के घट झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार कोरोना संकटात ऑपरेशन्सवर याचा खूप परिणाम झालाय. याचा सरळ फरक रेवेन्यू आणि प्रॉफिटवर पडला आहे. टीसीएससोबत इतर आयटी कंपनीत कॅप्जेमिनी, विप्रो आणि कॉग्निजेंटमध्ये देखील या अगोदर कॅम्पस मुलाखती घेतल्या होत्या. त्यांना भर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टीसीएसने अमेरिकेतील कॅम्पस प्लॅटमेंट्स यंदा दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सांगितले की,’मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरूवात करत आहे.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button